शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

मोदींनी 6 वर्षांत जेवढे 'कमावले', तेवढे महिनाभरात गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:29 PM

Corona Virus india मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हा सेन्सेक्स २४७१६ वर बंद झाला होता. गेल्या सहा वर्षांत २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्स आता पर्यंतच्या उच्चांकावर म्हणजेच 42273 वर गेला होता.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना संक्रमणाची लाट सुरु आहे. काही काळापूर्वी मोदींची लाट सुरू होती. होय, कारणही तसेच आहे. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ ला पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. यामुळे त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णयही घेतले. या निर्णयांचा परिणाम असा झाला की अर्थव्यवस्थेबरोबरच शेअर बाजारातही जोर दिसू लागला. देशात गुंतवणूकदारांचा महापूर आला, मात्र कोरोनाच्या लाटेने मोदींची लाट कमकुवत केली आणि त्यांच्याद्वारे सहा वर्षांत झालेली वाढ काही दिवसांत वाहून गेली. 

मोदींनी पदभार स्वीकारला तेव्हा सेन्सेक्स २४७१६ वर बंद झाला होता. गेल्या सहा वर्षांत २० जानेवारी २०२० ला सेन्सेक्स आता पर्यंतच्या उच्चांकावर म्हणजेच 42273 वर गेला होता. मात्र, काल ३९३४ अंकांची ऐतिहासिक घसरण झाली आणि सेन्सेक्स २५९८१ वर बंद झाला. सोमवारी यामध्ये १३.१५ टक्क्यांची घट नोंदविली गेली. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्समध्ये मोठी घसरण सुरू आहे. 

केवळ मार्च महिन्यातच सेन्सेक्स १२३१६ अंकांनी घसरला आहे. सोमवारी बाजार उघडताच पहिल्या तासाभरातच गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये बुडाले. यावेळी सेन्सेक्स ३००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. 

मार्चमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी १ लाख कोटी काढून घेतले आहेत. शेअर विक्री कमालीची वाढल्याने शेअर तज्ज्ञांनाही याचे आकलन करणे कठीण झाले आहे. देशात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू असून पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावरून शेअर बाजारही पुढील काळात आणखी खाली जाण्याची चिन्हे आहेत. शेअर बाजारातील ब्रोकरही पहिल्यांदा वर्क फ्रॉम होम करत आहेत. 

गुंतवणूकदारांचे ५२ लाख कोटी बुडालेजानेवारीमध्ये जेव्हा बाजार उच्चस्थानी होता तेव्हा बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १५९.२८ लाख कोटी होते. १३ मार्चला ३८ कामकाज दिवसांमध्ये हे घटून ११३.४९ लाख कोटींवर पोहोचले. म्हणजेच या काळात ४६ लाख कोटी रुपये बुडाले. आतापर्यंत हा आकडा ५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSensexनिर्देशांकcorona virusकोरोना वायरस बातम्या