coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:05 PM2020-05-20T15:05:32+5:302020-05-20T15:05:49+5:30

उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत.

coronavirus: What is the need for politics on migrate worker? - Aditi Singh BKP | coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

coronavirus:...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर  

Next

लखनौ - एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे देशभरात राजकारणालाही उत आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत. तसेच या प्रकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी आता या लढाईत उडी घेतली असून, संकटकाळामध्ये असे दुय्यम दर्जाचे राजकारण करणे योग्य नाही, असा घरचा अहेर त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच जर बस उपलब्ध होत्या तर त्यांचा वापर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात त्यांचा वापर का करण्यात आला नाही, अशी विचारणा, अदिती सिंह यांनी केली आहे.

अदिती सिंह यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, संकटाच्या वेळी अशा दुय्यम दर्जाच्या राजकारणाची गरज काय आहे? काँग्रेसकडून ज्या बसची यादी पाठवण्यात आली आहे, त्यापैकी अर्ध्याहून अधिक बसची माहिती खोटी आहे. या बसपैकी २९७ बस ह्या भंगार आहेत. तर ९८ ऑटोरिक्षा आणि अॅम्ब्युलन्स सारखी वाहने आणि ६८ वाहनांची कागदपत्रेच उपलब्ध नाहीत. हा कसला क्रूर विनोद आहे. जर बस उपलब्ध होत्या तर त्यांच्या वापर राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रात का करण्यात आला नाही?

दरम्यान,  स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बसेस चालविण्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय संघर्ष जुंपला आहे. या मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. तथापि, उत्तर प्रदेश सरकार काँग्रेसला यासाठी परवानगी देण्यास कचरत आहे. या मुद्यांवरून काँग्रेस आणि उत्तर प्रदेश सरकारदरम्यान कोंडी कायम असताना प्रियांका गांधी यांचे खाजगी सचिव संदीप सिंह यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांना पत्र पाठवून सर्व बसेस चालविण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने भूमिका बदलत मंगळवारी रात्री पत्र पाठवून काँग्रेसला बसगाड्यांचे नंबर, चालक आदीची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक हजार बसेस लखनौला पाठविण्यास सांगितले. प्रियांका गांधी यांनीही तातडीने सरकारला पत्र पाठवून कळविले की, एवढ्या कमी वेळेत बसेस लखनौला पोहोचू शकत नाहीत. 

 

Web Title: coronavirus: What is the need for politics on migrate worker? - Aditi Singh BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.