शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

coronavirus : लॉकडाऊनमुळे जलप्रदूषण घटलेे, गंगेेचे पाणी स्वच्छ झालेे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 10:34 IST

गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. मात्र...

वाराणसी - देशातील सर्वात मोठी आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र नदी मानली गेलेली गंगा नदी गेल्या काही दशकात वाढत्या औद्योगिकिकरणामुळे कमालीची प्रदूषित झाली आहे. गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या नामामी गंगे योजनेमुळेही फारसा फरक पडलेला नाही.  मात्र जे सरकारला आणि इतर संस्थांना जमले नाही ते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनने करून दाखवले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश कंपन्या आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश भागातील हवा शुद्ध झाली आहे. तसेच प्रदूषणकारी कारखान्यांमुळे जलप्रदूषणाचा सामना करत असलेल्या गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेवरही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सुपरिणाम झाला आहे. 24 मार्चला करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर गंगेच्या किनाऱ्यावरील अनेक प्रदूषणकारी कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे गंगेतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे गंगेच्या स्वच्छतेत 40 ते 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. 

 याबाबत प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सांगितले की, गंगेत होणाऱ्या एकूण प्रदूषणामध्ये उद्योगांचा वाटा 10 टक्के आहे. मात्र लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने प्रदूषणात मोठी घट झाली आहे. तसेच 15 आणि 16 मार्च रोजी झालेल्या पावसामुळे गंगेतील पाणी पातळी वाढल्याने तिची सफाई क्षमताही वाढली आहे. 24 मार्चपूर्वीच्या स्थितीशी तुलना केली असता गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.

टॅग्स :riverनदीcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशpollutionप्रदूषण