शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 22:49 IST

जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे.

ठळक मुद्देभारतात काही राज्ये खूप कमी लोकांची कोरोना चाचणी घेत आहेत काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या जात आहेतकोरोनाच्या चाचण्यांबाबत होत असलेली तिसरी चूक म्हणजे काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे. १९ मे रोजी देशातील दरदिवशीच्या कोरोना चाचण्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे पोहोचला होता. मात्र भारतात कोरोनाच्या चाचण्या घेण्याबाबत तीन गंभीर चुका होत आहेत. या चुका राज्यांकडून होत आहेत.

पहिली चूक - कमी होणाऱ्या चाचण्याभारतात काही राज्ये खूप कमी लोकांची कोरोना चाचणी घेत आहेत. याबाबतीत गुजरातचे उदाहरण देता येईल. कोरोनाच्या रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी असूनही चाचण्यांच्या बाबतीत हे राज्य खालून पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये दर दहा लाख लोकांमागे केवळ ८४ चाचण्या होत आहेत. अशा प्रकारांमुळे कोरोनाचे नवे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रयत्नांना धक्का बसत आहे. 

दुसरी चूक - रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी चाचण्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी आणि दररोज प्रति दहा लाख लोकसंख्येमागे केलेल्या चाचण्या महत्त्वाच्या मानल्या जातात. जास्त टीपीआर आणि कमी टेस्टिंगमुळे महाराष्ट्र व गुजरात अधिक अडचणीत आहेत. तर गोवा आणि जम्मू काश्मीर ही राज्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक चाचण्या करत आहेत. 

तिसरी चूक  - काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ कोरोनाच्या चाचण्यांबाबत होत असलेली तिसरी चूक म्हणजे काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ होय. मे महिन्याच्या मध्यावर काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. दिल्ली, गुजरातसारखी राज्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत टेस्ट वाढवत नाही आहेत. तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी टेस्टिंग वाढवले आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत रोज    सरासरी १४ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. तर गुजरात आणि दिल्लीत सरासरी सहा हजार चाचण्या होत आहेत. त्यातही गुजरात हे दिल्लीपेक्षा मोठे राज्य असूनही तिथे जेमतेम दिल्लीएवढ्याच चाचण्या झाल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

काश्मीर खोऱ्यातील हिंदूना शस्रे पुरवा, माजी पोलीस महासंचालकांचा सल्ला

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडू