शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus : टेन्शन पुन्हा वाढतय! देशभरात 24 तासांत 42,530 नवे रुग्ण; अर्ध्यावर रुग्ण 'या' एकट्या राज्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 09:17 IST

देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. (Corona Virus In India)

नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्ण संख्येत एका दिवसाच्या घसरणीनंतर पुन्हा मोठी वाढ झाली आहे. देशात मंगळवारी 42,530 रुग्ण आढळले. सोमवारी 30,029 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत 36,552 संक्रमित लोकांनी कोरोनावर मात केली असून 561 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, सक्रिय रुग्ण संख्येत 5,396 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 4.04 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (CoronaVirus: Tensions rise again; 42,530 new patients across the country in 24 hours, Half of the patients are in kerala)

सध्या केरळने संपूर्ण देशाचेच टेन्शन वाढवले आहे. मंगळवारी येथे 23,676 नवे रुग्ण समोर आले आहेत. सोमवारी हा आकडा 13,984 एवढा होता. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत 9,959 ची वाढ झाली आहे. येथे सध्या 1.72 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आकडेवारीच्या माध्यमाने समजून घ्या, देशातील कोरोना स्थिती -गेल्या 24 तासांत एकूण नवे रुग्ण - 42,530गेल्या 24 तासांत एकूण बरे झालेले रुग्ण - 36,552गेल्या 24 तासांत एकूण मृत्यू - 561आतापर्यंत एकूण संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या - 3.17 कोटीआतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या - 3.09 कोटीआतापर्यंत एकूण मृत्यू - 4.25 लाखउपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या - 4.04 लाख

Coronavirus Update: केरळमधून तिसऱ्या लाटेची सुरुवात झालीय का? तज्ज्ञांनी वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता

8 राज्यांत लॉकडाउन सारखे निर्बंध -देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन -देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाऊन आहे. येथे निर्बंधांसह सूट आहेत. यांत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.

केरळनं वाढवलंय टेन्शन -केरळमध्ये मंगळवारी, 23,676 लोक संक्रमित आढळले. 15,626 लोक बरे झाले आहेत, तर 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34.49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 32.58 लाख लोक बरे झाले आहेत, तर 17,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 1.72 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संकटं संपता संपेना! कोरोना, डेल्टानंतर आता RS व्हायरसचे थैमान; नवजात बाळांनाही विळखा; जाणून घ्या, लक्षणं

अशी आहे महाराष्ट्राची स्थिती -महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 6,005 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 6,799 रुग्ण बरे झाले असून 177 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 63.21 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यांपैकी 61.10 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.33 लाख लोक मरण पावले आहेत. सध्या राज्यात 74,318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतKeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल