शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Coronavirus : ‘कोरोना’मुळे ऑस्ट्रेलियात खरेदीला ऊत; ‘देसी स्टोअर्स’मध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे भारतीयांपुढेही संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:24 AM

Coronavirus : ब्रिस्बेन शहरातील तुवुंग उपनगरात राहणारे भारतीय तपीश डोंगरे यांनी ‘लोकमत’शी तेथील आपले अनुभव सामायिक केले.

- अंकिता देशकरनवी दिल्ली : इतर देशांप्रमाणेच आॅस्ट्रेलियातही कोरोना विषाणू पसरला असून, लोक भीतीपोटी जीवनावश्यक वस्तूंची भरमसाट खरेदी करून ठेवत आहेत. त्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. ‘देसी स्टोअर्स’मधील खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे आॅस्ट्रेलियात राहणारे भारतीय संकटात सापडले आहेत.ब्रिस्बेन शहरातील तुवुंग उपनगरात राहणारे भारतीय तपीश डोंगरे यांनी ‘लोकमत’शी तेथील आपले अनुभव सामायिक केले. त्यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतातील कोरोनाबाधितांची संख्या ३८२ झाली आहे. काल रात्रीतून विषाणूग्रस्तांची संख्या ७५ ने वाढली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात २९ नवे रुग्ण सापडल्यानंतर आकडा १५0 वर गेला आहे. तपीश यांनी सांगितले की, घाबरलेले लोक टॉयलेट पेपरसह विविध जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मॉल्समधील सर्व वस्तू संपल्या आहेत. भारतीय दुकानांतील गव्हाचे पीठ, मसाले, हळद, रवा आणि लोणचे यासारख्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.डोंगरे हे ग्रिफिथ विद्यापीठात सहाय संशोधक आहेत. सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेले सॅनिटायझर्स लोक चोरून घेऊन जात असून, विद्यापीठाच्या एका बैठकीत अधिकाऱ्यांत यावर गमतीशीर चर्चा झाली, असे डोंगरे यांनी सांगितले.डोंगरे यांनी सांगितले की, येथील आरोग्यसेवा चांगल्या आहेत. विदेशी नागरिकांशी स्थानिकांची वर्तणूक चांगली आहे. वित्तीय ओझे कमी व्हावे यासाठी घरभाड्यांत १0 टक्के कपात करण्यात आली आहे. येथील शाळा-महाविद्यालये मात्र अजूनही सुरू आहेत. या साथीच्या काळात चांगले अनुभवही येत आहेत. अनेक लोक सेल्फ-आयसोलेशनसाठी मदत करीत आहेत. ज्येष्ठांना मदत करीत आहेत. खाद्य कंपन्या मोफत डिलिव्हरी किंवा किमतीत सवलत देत आहेत. तपीश यांच्या पत्नी अनुपमा ज्योती या शेफ असून, त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे नोकºया गमावण्याचे संकट निर्माण झाले आहे.- १३ आॅस्ट्रेलियन डॉलरला मिळणाºया गव्हाच्या पिठाच्या बॅगेसाठी आता २७ डॉलर मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी तर वस्तूच मिळेनाशा झाल्या आहेत. वस्तूंअभावी अनेक दुकाने लवकरच बंद होत आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींसाठी दुकाने सकाळी एक तास आधीच उघडली जात आहेत. सॅनिटायर आणि मास्क यांची तीव्र टंचाई आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAustraliaआॅस्ट्रेलिया