शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही, जरा मुंबईकडून शिका... SC नं केंद्राला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:27 PM

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.

नवी दिल्ली - ऑक्सिजन संकटाच्या मुद्द्यावर केंद्राच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे, की आदेशाचे पालन करणे, ही केंद्राची जबाबदारी आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्रवाई करा. (Supreme court on centre plea delhi hc contempt warning on oxygen supply in delhi)

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकटावर सल्ला दिला, की वैज्ञानिक पद्धतीने याच्या वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशात दिल्लीने काही शिकायला हवे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.

आम्ही बफर स्टॉक तयार करण्याचे संकेत दिले होते. अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत केले जाऊ शकते, तर निश्चितपणे दिल्लीतही केले जाऊ शकते. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा आणि कसा मिळेल, हे सोमवारपर्यंत सांगा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

राजधानीतील ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात कुचराईमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने बजावलेल्या अवमानना नोटिशी विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली.गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार