Coronavirus: Rs 4 lakh assistance to families of coronavirus victims From BIhar Government pnm | Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक मदत बिहार सरकारने घेतला निर्णय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करणार कुटुंबीयांना मदत

पटणा – देशात कोरोना बाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला असून आतापर्यंत ३ हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी विविध राज्य सरकारकडून उपाययोजना सुरु आहेत.

बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या नितीश कुमार सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. या संकटापासून वाचण्यासाठी बिहार सरकारने लोकांना दिलासा देणारे पॅकेज जाहीर केले आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने बैठका घेत आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना संक्रमित आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाख देण्याचा निर्णय झाला. त्याचसोबत या बैठकीत २४ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. बिहार सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २० लाख प्रवाशांच्या खात्यात प्रत्येकी १ हजार रुपये पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय झाला. राज्यातील १०० जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या निवासस्थानांची सोय केली आहे. प्रत्येक बाल श्रमिक पुनर्वाससाठी २५ हजारांची मदत करण्यात येणार आहे. शुक्रवारी बिहारमध्ये १७९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत राज्यात २ हजार १६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

मागील २ दिवसांत कोरोना संक्रमणाचा आकडा ३९० पर्यंत पोहचला आहे. यातील सर्वात जास्त १८६ रुग्ण पटणा येथे आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मधुबनीती ३४, बेगूसरायमध्ये २०, गोपाळगंजमध्ये ८, सारणमध्ये ६, नवादामधील तीन, वैशाली आणि अरवलमधील प्रत्येकी एक अशाप्रकारे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. या व्यतिरिक्त समस्तीपूर येथे १०, पूर्व चंपारणमध्ये, पश्चिम चंपारणमधील पाच, मुझफ्फरपूरमधील कुझिहरमध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक

कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!

भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!

कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कार्य करतो ‘हा’ विष्णू!

Web Title: Coronavirus: Rs 4 lakh assistance to families of coronavirus victims From BIhar Government pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.