Coronavirus: Vishnu who have been cremated on Corona infected bodies pnm | Coronavirus: कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कार्य करतो ‘हा’ विष्णू!

Coronavirus: कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कार्य करतो ‘हा’ विष्णू!

ठळक मुद्देकोरोना रुग्णांचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार रखडले, लोकांमध्ये कोरोनाची भीती मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करते विष्णू आणि टीम

नवी दिल्ली – कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने एकीकडे सरकार चिंतेत आहे तर दुसरीकडे लोकही कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. अनेकजणांनी मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार रखडले आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

डॉक्टर्स, पोलीस यासारखे अनेक कोरोना योद्धा समाजात मदतीसाठी पुढे येत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे विष्णू. हा जयपूर राहणारा असून सध्या कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम विष्णूकडून केले जाते. इंडिया टाईम्सनुसार जयपूर राहणारा विष्णूसोबत एक टीम कार्यरत असते. जी कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करते. मृतदेह कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे पाहिले जात नाही. आतापर्यंत त्यांनी १५ पेक्षा अधिक मुस्लीम मृतदेह दफन केले आहेत. तर ५३ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे सर्वात अवघड असतं तसेच धर्माचं काम असतं. कोरोना व्हायरसच्या पूर्वी विष्णू हे कब्रिस्तानात कधीच गेले नाहीत. परंतु आता ते आणि टीम कब्रिस्तानात जाऊन स्वत: दफन करण्यासाठी खोदकाम करतात. त्याचसोबत मृतदेह त्यात दफन करुन माती टाकण्याचंही काम करतात.

विष्णूच्या संपूर्ण टीमने मिळून ६८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. आज कोरोनाची अशी बिकट परिस्थिती आहे की, लोक शवघरात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अस्थिही घेण्यास येत नाही. आगामी काळात अशाप्रकारे दिवस येऊ नये यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतात. ज्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू होणार नाही तेव्हा आम्ही आनंदी होऊ असं विष्णू सांगतात.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक

कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!

भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!

कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज

 

 

Web Title: Coronavirus: Vishnu who have been cremated on Corona infected bodies pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.