शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

CoronaVirus : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह, एक दिवस आधीच पत्नीही झालीय संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:21 IST

यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्वीट करत माहिती दिली आहे. गेहलोत त्यांच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरनाची लागण झाली आहे. यानंतर गेहलोत आयसोलेशनमध्ये गेले होते. 

जयपूर - संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुक्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा समावेश आहे. याच यादीत आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचेही नाव आले आहे. त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (CoronaVirus Rajasthan cm Ashok Gehlot tests positive for covid19 says he is asymptomatic)

यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्वीट करत माहिती दिली आहे. गेहलोत त्यांच्या एक दिवस आधी त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरनाची लागण झाली आहे. यानंतर गेहलोत आयसोलेशनमध्ये गेले होते. 

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

गेहलोत यांचं ट्विट -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'कोरोना टेस्ट केल्यानंतर आज माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कुठल्याही प्रकारचे लक्षण नाहीत आणि मी ठीक आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत मी आयसोलेशनमध्ये राहूनच काम सुरू ठेवणार आहे.'

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे.

परिस्थिती हाता बाहेर, हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा...; योगी सरकारला HC नं फटकारलं

देशात मृतांचा एकूण आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस