coronavirus: Rahul Gandhi gathers evidence on Chinese infiltration, ignoring it will cost the country dearly | coronavirus: राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत जमा केले पुरावे, दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल

coronavirus: राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत जमा केले पुरावे, दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भारतीय हद्दीत चिनी घुसखोरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुरावे गोळा केले आहेत.

चिनी घुसखोरांबाबत देशभक्त लडाखी आवाज बुलंद करीत आहेत. ते ओरडून देशाच्या सरकारला इशारा देत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास देशाला महागात पडेल. देशासाठी त्यांचा आवाजा ऐका, असेही राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी १०० पेक्षा अधिक लडाखी कार्यकर्त्यांकडे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सीमेवर जे काही घडत आहे, त्याचे व्हिडिओ फुटेज एकत्रित करून पाठवावेत, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. असे १५० पेक्षा अधिक फुटेज राहुल गांधी यांच्याकडे  जमा झालेले आहेत. त्यात गलवान खोऱ्याच्या परिसरातील चिनी हालचालींची माहिती आहे.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी जगभरातील विशेष तज्ज्ञांशी संपर्क साधलेला आहे. ते सॅटेलाईटद्वारे राहुल गांधी यांना माहिती देत आहेत. कपिल सिब्बल यांनी शनिवारी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी छायाचित्रे सर्वांना दाखवली व म्हटले आहे की, छायाचित्रे खोटे बोलत नाहीत. पंतप्रधान देशाला याचे उत्तर देणार का?

English summary :
Rahul Gandhi gathers evidence on Chinese infiltration, ignoring it will cost the country dearly

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Rahul Gandhi gathers evidence on Chinese infiltration, ignoring it will cost the country dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.