CoronaVirus News: मनमोहनसिंग यांच्या बंगल्याबाहेर क्वारंटाइनची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:32 IST2020-06-14T03:31:42+5:302020-06-14T03:32:03+5:30

मोलकरणीच्या मुलीला संसर्ग

CoronaVirus Quarantine notice outside Manmohan Singhs house | CoronaVirus News: मनमोहनसिंग यांच्या बंगल्याबाहेर क्वारंटाइनची नोटीस

CoronaVirus News: मनमोहनसिंग यांच्या बंगल्याबाहेर क्वारंटाइनची नोटीस

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या दिल्लीतील सरकारी बंगल्याबाहेर क्वारंटाइनची नोटीस लागल्याने काँग्रेस नेत्यांसह अनेकांना चिंता वाटू लागली होती. मात्र मनमोहनसिंग यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने व ते कुटुंब या बंगल्यातील नोकरांसाठी असलेल्या खोलीत राहात असल्याने ही नोटीस लावण्यात आली होती. सिंग यांची प्रकृती ठीक झाली असून, गुरुवारी काँग्रेस पक्षाने आयोजिलेल्या एका बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी हजेरी लावली होती. डॉ. मनमोहनसिंह यांना छातीत दुखत असल्याने काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यातून ते बरे झाले.

Web Title: CoronaVirus Quarantine notice outside Manmohan Singhs house