Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:29 PM2020-04-10T18:29:36+5:302020-04-10T19:15:00+5:30

Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे.

Coronavirus Punjab extends lockdown/curfew in the state till May 1st SSS | Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

Coronavirus : कोरोनाचा धसका! 'या' राज्याने घेतला 1 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

Next

चंदिगड - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 170 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही 6000 हून अधिक झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाआधीच पंजाब सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंजाबमध्ये 1 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी ( 10 एप्रिल) याबाबत माहिती दिली आहे. पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. 100 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पंजाबमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 132 इतकी झाली आहे. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी अनेक राज्यांत आल्याने प्रशासनाची झोप उडाली. यातील काही जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. मात्र अजूनही काहींचा शोध लागलेला नाही. काही राज्यांनी तबलिगींना स्वतःहून समोर येण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही काही जण अजूनही समोर येत नसल्याने काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने तबलिगींना इशारा दिला होता. 24 तासांच्या आतमध्ये स्वतःहून समोर या, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असं पंजाब सरकारने तबलिगींना सांगितलं होतं. पंजाब सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यात लपून बसलेल्या तबलिगींनी 24 तासांच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात हजर व्हावं. जे हे करणार नाहीत त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होतील असं पत्रक जारी केलं होतं. 

ओडिशा सरकारने 30 एप्रिलपर्यत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.  कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी ओडिशा सरकारने 30 एप्रिलपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा पहिलं राज्य आहे. तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 17 जूनपर्यंत बंद राहतील अशी माहिती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती देखील नवीन पटनाईक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : अनोखा आदर्श! ...अन् त्याने झाडावरच बांधलं घर, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमुळे धान्य विकण्यात अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या

Coronavirus : दिलासादायक! भारतातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त

Coronavirus : ...म्हणून 'या' देशाने थांबवला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर

 

Web Title: Coronavirus Punjab extends lockdown/curfew in the state till May 1st SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.