शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

coronavirus: लसीकरणात जनतेचाही सहभाग खूप गरजेचा, केंद्रीय आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 05:22 IST

coronavirus: कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे,

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : कोरोना लसीकरण ही फक्त केंद्र किंवा राज्य सरकारची जबाबदारी नाही तर यात जनतेचा सहभागही असणे खूप गरजेचे आहे, असे सांगून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव भारत भूषण म्हणाले की, कोल्डचेनच्या तयारीचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यात तीन कोटी हेल्थ आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोविड शिल्ड’ आणि भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सिन’ आणि फायझरने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज दिला आहे.  देशात सहा लशींची मानवी चाचणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस विकसित करणाऱ्या औषधी कंपन्यांना भेट देऊन आढावा घेतला होता.शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदील मिळताच मोठ्या प्रमाणांवर लसीचे उत्पादन सुरु केले जाईल.  उत्पादनसोबत  कमी वेळेत प्रत्येकासाठी लस उपलब्ध होईल, यादृष्टीने व्यापक तयारी केली  आहे.  लसीकरण व्यवस्थापनासाठी  या वर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्यात आले होते, असे राजेश भूषण यांनी  सांगितले.तज्ज्ञांचे पथक लोकसंख्या, लस खरेदी, लस वितरण आदी महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करीत आहेत. लसीकरणासाठी को-विन ॲपही तयार करण्यात आले. लस दिल्यानंतर डिजिलॉकरमध्ये लसीकरण प्रमाणपत्र येईल. लसीकरणात केंद्र आणि राज्यांसोबत जनतेचा सहभागही जरुरी आहे. शीतकरण साखळीच्या तयारीच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य आणि कोविड-१९ लढ्यातील अग्रणी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले केले जाईल. देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांहून कमी आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नवीन रुग्ण आढळण्याचा दरही कमी होत आहे.  देशातील पाच राज्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५४ टक्के आहे.  यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, प. बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.  संसर्गीत रुग्णांच्या प्रमाणाबाबत बड्या देशांची तुलना केल्यास भारतात हे प्रमाण सात ते आठ पटीने जास्त आहे.

अन्य देशांनाही पुरवठा करण्यास सक्षम...देशवासियांच्या गरजेनुसार लशीचे उत्पादन करण्यास भारत पूर्णत: सक्षम असून अन्य देशांची लसीचा पुरवठाही करण्यासही आपण सक्षम आहोत. आता  प्रतीक्षा काही दिवसांचीच आहे, असे कोरोना कृती दलाचे चेअरमन आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. 

९९ वर्षांच्या भवतारिणी समंता यांची कोरोनावर मात हावडा : वयस्कर लोकांसाठी कोरोना हा फारच जीवघेऊ मानला जातो; परंतु जगण्याच्या तीव्र इच्छेतून वयोवृद्धही या महामारीवर विजय मिळवत आहेत. पश्चिम बंगालच्या भवतारिणी समंता यांचा १०० वा वाढदिवस काहीच महिने दूर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु डॉक्टर आणि समंता यांच्या कुटुंबांतील सदस्यांना आश्चर्याचा धक्का देत भवतारिणी यांनी कोरोना विषाणूला पराभूत केले.   समंता यांना ९९ वर्षे ११ महिने या वयात ताप येऊद श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी फुलेश्वर भागातील कोविड-१९ रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ ची चाचणी केली गेली. त्यात त्या पॉझिटिव्ह निघाल्या. रुग्णालयाचे संचालक शुभाशिष मित्रा म्हणाले की, समंता यांच्यावरील उपचारांसाठी डॉक्टरांची तुकडी तयार केली गेली. ‘वेळच्या वेळी काळजी घेतल्यामुळे त्या बऱ्या होत गेल्या. त्यांना आम्ही कोरोनातून मुक्त करू शकलो व १०० व्या वाढदिवसाआधी त्यांना घरी पाठवू शकलो याचा आनंद आहे.’ माेठा दिलासा : काेराेनाच्या २६,५६७ नव्या रुग्णांची नाेंद नवी दिल्ली : काेराेनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट हाेत असून तब्बल १५१ दिवसांनी नव्या रुग्णांचा आकडा २७ हजारांच्या खाली आला आहे.  देशभरात २६ हजार ५६७ नवे रुग्ण आढळले. तसेच मृतांच्या संख्येतही घट नाेंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही घटला आहे.यापूर्वी १० जुलैला २६ हजार ५०६ नवे रुग्ण आढळले हाेते. त्यानंतर ११ जुलैला हा आकडा २७ हजारांच्या  पुढे गेला हाेता. देशात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली हाेती.  दिवाळीपूर्वी तीन नाेव्हेंबरला २८ हजार नवे रुग्ण आढळले हाेते.  भारतात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत हाेती. दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वत्र माेठी गर्दी झाली हाेती. परिणामी, काेराेनाची रुग्णसंख्या वाढू लागली हाेती; परंतु सुमारे तीन आठवड्यांमध्येच नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले. मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली असून हा आकडा ३९ हजार ०४५ इतका नाेंदविण्यात  आला. देशभरात एकूण ९१ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाले असून १ लाख ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ३ लाख ८३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य