Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:29 PM2020-03-27T13:29:26+5:302020-03-27T13:35:10+5:30

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले. मात्र तरीही अनेकजण आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करत आहे.

Coronavirus PM modi shared bano corona warriors video daughter wrote letter to father SSS | Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ

Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ

Next

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणेघरातच राहणेहा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहेअसं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले. मात्र तरीही अनेकजण आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करत आहे. पंतप्रधानांनी Be Corona Warrior अशा एका मोहिमेला सुरुवात केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुक्रवारी (27 मार्च) एका लेकीचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका मुलीने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये तिने आपल्या बाबांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. घराबाहेर पडू नका, तुम्ही घराबाहेर पडलात तर कोरोना जिंकेल. घरी येण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा कोरोना आपल्यावर आणखी वर्चस्व गाजवेल. जिथे आहात तिथे राहा, असा सल्ला मुलीने पत्रातून आपल्या वडिलांना  दिला आहे.

पंतप्रधानांनी मुलीने वडिलांना लिहिलेल्या पत्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिअर बाबा, मी तुम्हाला अजिबात मिस करत नाही आहे. आईसुद्धा करत नाही. मुंबईतून पळून येण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. आपण घराबाहेर पडल्यास कोरोना जिंकेल आणि आपल्याला कोरोनाला हरवायचे आहेअसं लेकीने आपल्या बाबांना पत्राच्या माध्यमातून सांगितलं आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं मोदींनी याआधी सांगितलं आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला  आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. कोरोनाने जवळपास 198 देशांना विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतातील अनेकांची चाचणी निगेटिव्ह आली असून काहींना उपचारानंतर रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी देशात सर्वात मोठं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता

Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

 

Web Title: Coronavirus PM modi shared bano corona warriors video daughter wrote letter to father SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.