शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus : कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल, पाहून वाटेल नवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 19:56 IST

Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

हैदराबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक झाली आहे. जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर एका कुत्र्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे माणसांसह आता प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनापासून शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी एकाने अनोखी शक्कल लढवली आहे.

वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच एका व्यक्तीने घाबरून आपल्या शेळ्यांना मास्क लावल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली असून कोरोनापासून आपल्या शेळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्याने त्यांना मास्क लावण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, वेंकटेश्वर राव असं या व्यक्तीचं नाव असून ते तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात राहतात. त्यांच्याकडे जवळपास 20 शेळ्या आहेत. त्यांनी या सर्व शेळ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांच्या तोंडावर मास्क लावले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आपल्या कुटुंबाजवळ शेतीसाठी पुरेशी जमीन नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळ्यांवरच चालतो. म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी मास्क लावले असल्याचं वेंकटेश्वर राव यांनी सांगितलं आहे.

वाघिणीला कोरोना झाल्याची बातमी समजल्यानंतर शेळ्यांच्या तोंडाला मास्क लावले. मीसुद्धा तोंडाला मास्क लावत आहे. जेव्हा शेळ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात तेव्हा मास्क लावलेला असतो असं देखील त्यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या वेगाने पसरणाऱ्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सोशल डिस्टेसिंगसारखा पर्याय अवलंबत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर! अमेरिकेत 11 भारतीयांचा मृत्यू, 16 जणांना लागण

Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...

Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या 

Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार

Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाTigerवाघDeathमृत्यूIndiaभारत