शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Coronavirus: ओमायक्रॉन भारतात, सर्वाधिक धोका कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:34 IST

Coronavirus: कोरोना संसर्गाचा सर्वात वेगाने प्रसार करणारा omicron variant भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. भारतात आता या विषाणूचा कोणाला अधिक धोका असू शकतो, पाहूया...

कोरोना संसर्गाचा सर्वात वेगाने प्रसार करणारा ओमायक्रॉन विषाणू भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कर्नाटकात दोन रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोना झाल्याचेही निदान झाले आहे. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या या विषाणूची सर्वांना धास्ती आहे. जगभरात अनेक देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतात आता या विषाणूचा कोणाला अधिक धोका असू शकतो, पाहूया... 

भारतात किती चिंताजनक स्थिती?- लसीचे दोन्ही डोस  घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे पुढे आले  आहे. त्यामुळे भारताची चिंता अधिकच वाढली आहे.- भारतात आतापर्यंत १.२५ अब्ज डोस देण्यात आले. त्यातील ७९ कोटी लोकांनी पहिला डोस पूर्ण केला तर  ४६ कोटी लोकांचे दोन्ही  डोस पूर्ण झाले आहेत.- भारतातील केवळ  32 % लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. शिवाय १२ कोटी लोकांनी दुसरा डोसच घेतलेला नाही. हीच चिंतेची बाब ठरू शकते.- ओमायक्रानला लसीकरण रोखू शकणार नाही, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे भीती वाढली आहे. असे झाल्यास भारतात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते. 

सर्वाधिक धोका कोणाला?ज्यांनी लसीचा एकही  डोस घेतला नाही त्यांना सर्वाधिक धोका असेल. लस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे केवळ एक डोस घेऊन वावरणाऱ्यांना ओमायक्रॉनचा धोका अधिक असू शकतो. त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.भारतात चिंतेची गोष्टभारतात जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा वेग अत्यंत कमी आहे. कोणत्या प्रकारच्या विषाणूची बाधा कोणत्या रुग्णांना झाली आहे, हे तपासण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते. तेच जर धिम्या गतीने होत असेल, तर वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणे कठीण होऊ शकते. 

दहा दिवसांत ३३ देशांत शिरकाव२३ नोव्हेंबरद. अफ्रिका १८३बोत्सवाना १९२६ नोव्हेंबरनेदरलँड १६हाँगकाँग ०७इस्रायल ०२बेल्जियम ०२२७ नोव्हेंबरब्रिटन ३२जर्मनी १०ऑस्ट्रेलिया ०८इटली ०४झेक रिपब्लिक ०१२८ नोव्हेंबरडेन्मार्क ०४ऑस्ट्रिया ०१२९ नोव्हेंबरकॅनडा ०७स्वीडन ०४स्वित्झरलँड ०३स्पेन ०२३० नोव्हेंबरपोर्तुगाल १३जपान ०२१ डिसेंबर ३३द. कोरिया ०३नायजेरिया ०३ब्राझिल ०२नॉर्वे ०२सौदी अरेबिया ०१आयरलँड ०१यूएई ०१२ डिसेंबरभारत ०२ग्रीस ०१३ डिसेंबरअमेरिका ०८सिंगापूर ०२मलेशिया ०१फ्रान्स ०८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत