Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:08 PM2021-06-30T20:08:59+5:302021-06-30T20:46:02+5:30

Coronavirus in India: मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली.

Coronavirus: The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states | Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

Coronavirus: दिलासादायक! देशातील कोरोनाबळींचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले, अनेक राज्यांत १०० हून कमी रुग्ण 

googlenewsNext

नवी दिल्ली - संसर्गाच्या भयावह वेगामुळे संपूर्ण देशाला भीतीची भयाण छाया दाखवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून बऱ्यापैकी ओसरली आहे. (Coronavirus in India) देशातील दैनंदिन रुग्णवाढ आणि मृत्यूंच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीच्या प्रमाणामध्येही तब्बल ७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सीएनएन न्यूज १८ द्वारे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार मे महिन्यात भारतामध्ये कोरोना विषाणुमुळे १ लाख १७ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. (CoronaVirus Positive News) तर नव्या रुग्णांची संख्या ही ८८.८२ टक्के एवढी राहिली होती. जूनमध्ये आतापर्यंत ६६ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २१ लाख ८७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states)

मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली. अनेक राज्यांत मे महिन्यात हजारो रुग्णांची नोंद होत होती. तिथे आता ही संख्या शेकडो रुग्णांवर येऊन मर्यादित झाली आहे. काही राज्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या ४५ हजार ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आङे. ही संख्या ७ मे च्या तुलनेत ८९ टक्क्यांनी कमी आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना एके दिवशी देशात सर्वाधिक ४ लाख ४१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. जागतिक स्तरावरही हा आकडा सर्वाधिक आहे.

भारतामध्ये १ जून रोजी कोरोना विषाणूच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८.९५ लाख एवढी होती. ती आता ७२ टक्क्यांनी घटली आहे. देशामध्ये बुधवारी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार एवढी आहे. देशामध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० मे रोजी ३७ लाख ४५ हजार एवढी होती. त्याच्या तुलनेत आता सक्रिय रुग्णांचे प्रमाण  ८६ टक्क्यांनी घटले आहे.

देशामध्ये गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या २० लाख होती. १६ सप्टेंबर रोजी हा आकडा ५० लाखांवर पोहोचला. १९ डिसेंबर रोजी या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला. चार मे रोजी देशातील कोरोबाधितांची संख्या २ दोन कोटीच्या पुढे गेली. तर २३ जून रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली. 
 

Web Title: Coronavirus: The number of coronaviruses in the country has dropped by 43 per cent, with less than 100 patients in many states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.