coronavirus: "कोरोनाची तिसरी आणि चौथी लाटही येण्याची भीती, आतापासूनच तयारी करावी लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:01 PM2021-04-29T16:01:23+5:302021-04-29T16:02:44+5:30

coronavirus News : बेसुमार वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तर लाखो कोरोनाबाधितांवरील उपचारांची व्यवस्था करताना सरकारची त्रेधा उडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाची चिंता वाढवणारे विधान केले आहे.

coronavirus: Nitin Gadkari Says,"Fear of third and fourth wave of coronavirus, we have to prepare now" | coronavirus: "कोरोनाची तिसरी आणि चौथी लाटही येण्याची भीती, आतापासूनच तयारी करावी लागेल”

coronavirus: "कोरोनाची तिसरी आणि चौथी लाटही येण्याची भीती, आतापासूनच तयारी करावी लागेल”

Next

नागपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संपूर्ण देशावर गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. (coronavirus in India) बेसुमार वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तर लाखो कोरोनाबाधितांवरील उपचारांची व्यवस्था करताना सरकारची त्रेधा उडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाची चिंता वाढवणारे विधान केले आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलो तरी देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाटही येण्याची शक्यता आहे, त्यासाठी आतापासूनच तयारी ठेवावी लागेल, अशी भीती नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी व्यक्त केली आहे. (Union Minister Nitin Gadkari Says,"Fear of third and fourth wave of coronavirus, we have to prepare now")

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे सुमारे ३ लाख ८० हजार नवे रुग्ण सापडले होते. तर साडेतीन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र तरीही तिसरी आणि चौथी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आतापासून तयारी ठेवावी लागेल, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, देशाप्रमाणेच राज्यामध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबई, ठाण्यासह काही शहरात रुग्णसंख्या कमी झाली तरी काल  राज्यात कोरोनाच्या ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ अॅक्टिव रुग्ण आहेत.  

Web Title: coronavirus: Nitin Gadkari Says,"Fear of third and fourth wave of coronavirus, we have to prepare now"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.