शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

CoronaVirus News : खळबळजनक! कुटुंबीयांनी दफन केला पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला मृतदेह अन् 18 दिवसांनी घरी परतली महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 12:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 15 मे रोजी तिच्या पतीने पॉलिथीनमध्ये असलेला पत्नीचा मृतदेह दफन केला. त्यानंतर 1 जून रोजी कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ही महिला घरी परतल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील ख्रिश्चनपेठ गावात ही घटना घडली आहे. गिरिजाम्मा असं या महिलेचं नाव असून यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 मे रोजी विजयावाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

महिलेचे पती नियमितपणे पत्नीला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होते. 15 मे रोजी त्यांना त्यांची पत्नी कोविड वॉर्डमध्ये नसल्याचे लक्षात आलं. त्यांनी इतर वॉर्डमध्येही तपास केला मात्र गिरिजाम्मा यांचा पत्ता लागला नाही. त्यावेळी तिथल्या नर्सनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाला असावा असे त्यांना सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना शवगृहातून पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह दिला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पतीने तो मृतदेह गावी आणला. कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातून पॉलिथीनमध्ये गुंडाळून दिलेला मृतदेह कुटुंबीयांनी उघडून पाहिला नाही आणि तो दफन केला.

1 जून रोजी कुटुंबाने एका शोकसभेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरिजम्मा घरी परतल्या. त्यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच कोणत्या तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. या सर्व प्रकरणाची माहिती नसलेल्या गिरिजम्मा कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोणी आपल्याला घ्यायला आलं नाही यामुळे दु:खी होत्या. रुग्णालयाने त्यांना घरी जाण्यासाठी 3000 रुपये दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूAndhra Pradeshआंध्र प्रदेश