शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

CoronaVirus News : लय भारी! कोल्ड्रींक्सच्या जागी 'काढा' अन् मास्क लावून कोरोना संसर्ग टाळा; असा रंगला अनोखा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 6:47 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,73,13,163 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,95,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशातील काशीमध्ये कोरोना नियमावलीचं पालन करून एका अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. लग्नात आलेल्या पाहुण्याचं स्वागत हे नेहमीप्रमाणे कोल्ड्रींक्स देऊन न करता काढा देऊन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी भेट म्हणून मास्क दिला आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच पालन करण्यासाठी  वऱ्हाडी मंडळींनी दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून डान्स देखील केला आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशी येथे राहणारे हरतलाल चौरसिया यांच्या मुलाचा विवाहसोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने कोरोन नियमांचं पालन करून करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रींक्स ऐवजी शरीरासाठी गुणकारी असणारा असा काढा देण्यात आला. तसेच भेट म्हणून मास्कच वाटप करण्यात आलं आहे. 

हरत लाल चौरसिया यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता कोल्ड्रींक्सच्या जागी काढा ठेवण्यात आला होता. तसेच कोणत्याही पाहुण्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती असं म्हटलं आहे. गेल्या वर्षी आपल्या मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं. पण देशातील लॉकडाऊनमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे आता कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना देखील लग्नाची ही नवीन पद्धत फारच आवडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न