शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

CoronaVirus News: विषाणूला सेकंदात देईल धक्का, अँटी कोरोना कापडाचा इरादा पक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 08:49 IST

CoronaVirus News: जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या लॅबमध्ये या कापडाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरवरच अवलंबून न राहता, तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळी उपकरणे आणि वस्तूंचा शोध तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ लावत आहेत. कापड उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या सियारामने अँटी-कोरोना कापडाची निर्मिती केली आहे.जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या लॅबमध्ये या कापडाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरवरच अवलंबून न राहता, तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळी उपकरणे आणि वस्तूंचा शोध तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ लावत आहेत. त्यात आता कापड उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या सियारामने अँटी-कोरोना कापडाची निर्मिती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेल्या लॅबमध्ये या कापडाची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. अँटी-कोरोना कापड हे विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ते ९९.९४ टक्के प्रभावी ठरू शकतं.२५ वर्षांपासून आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत असणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी हेल्थगार्ड यांच्या सहकार्यार्ने हे कापड विकसित करण्यात आले आहे. आपले शरीर ९० टक्के कपड्यांनी झाकलेले असते. विषाणू कपड्यांवर बराच काळ राहतात आणि तिथूनच शरीरातही प्रवेश करू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच, नैसर्गिक, उत्तम दर्जांचं आणि विघटनशील साहित्य वापरून हे कापड तयार करण्यात आले आहे. या कापडावरील प्रक्रिया केलेला थर पाण्यात विरघळणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.हे कापड तयार करताना ‘कॉस्मेटिक बेस्ड केमिस्ट्री कोटिंग’चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जेव्हा विषाणू कपड्यावर बसेल, तो काही सेकंदात नष्ट होईल, असा दावा ‘सियाराम’चे सीएमडी रमेश पोद्दार यांनी केला आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू व्यवहार सुरू होतील. सगळ्यांना घराबाहेर पडावे लागेल. त्यावेळी अँटी-कोरोना कापड उपयुक्त ठरू शकते. विषाणूंशी सामना करणे हा या कापडाचा मूळ उद्देश असला, तरी स्टाइल, टेक्स्चर यात कुठेही तडजोड केली नसल्याचेही सियारामने म्हटले आहे. अर्थात, हे कापड वापरतानाही मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची आग्रही सूचना कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.

"कोरोनाची सद्यस्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, तसेच येत्या काही दिवसांत भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबत राहावे लागेल" अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अँटी-कोरोना कापड हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे. 

वैद्यकीय उपकरणे, साहित्यांसाठी आपल्याला चीनवरच अवलंबून रहावे लागत होते. यामुळे भारतातच हे किट बनविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. वाराणसीमध्ये डीआरडीओने पीपीई किट बनविण्यासाठी एका फॅक्टरीला मंजुरी दिली आहे. या फॅक्टरीमध्ये सात प्रकारची किट बनविण्यात आली होती. या सातही किटना डीआरडीओने निवडले असून बनविण्याची मंजुरीही दिली आहे. बनारसी साड्य़ा बनविणाऱ्या कारागिरांनीच हे किट तयार करत आहेत. देशात सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रामध्येच आहेत. त्याखालोखाल दिल्ली, तमिळनाडू व गुजरात यांचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णांच्या तुलनेत तमिळनाडूचा मृत्युदर गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश यांच्यापेक्षा बराच कमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४0७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात १ जूनपासून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ८६६ म्हणजेच सुमारे तीन लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण दिसून येत होते. तिसऱ्या आठवड्यांनंतर दरदिवशी १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आहे. पण आतापर्यंत १७ हजारांचा आकडा कधीच ओलांडला नव्हता. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या १ लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५८. २४ टक्के असून, मृत्युदर जगातील अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या