CoronaVirus News: दिलासादायक! सहाव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:03 IST2020-11-14T00:53:30+5:302020-11-14T07:03:48+5:30
दिलासादायक घटना; बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.९७ टक्के; ४४,८७९ नवे रुग्ण

CoronaVirus News: दिलासादायक! सहाव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी
नवी दिल्ली : देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी पाच लाखांपेक्षा कमी आहे. शुक्रवारी ४४,८७९ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ८७.२८ लाखांवर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८१ लाख १५ हजार झाली असून त्यांचे प्रमाण ९२.९७ टक्के आहे. कोरोनामुळे शुक्रवारी आणखी ५४७ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,२८,६६८ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४७ टक्के इतका आहे. देशात सध्या ८७,२८,७९५ कोरोना रुग्ण असून त्यापैकी ८१,१५,५८० जण बरे झाले आहेत.
अमेरिकेत ६७ लाख लोक कोरोनामुक्त
अमेरिकेमध्ये १ कोटी ८ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ६७ लाख २८ हजार जण बरे झाले. सध्या दररोज १ लाख ४५ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. युरोपमध्ये फ्रान्स या देशात सर्वाधिक म्हणजे १८ लाख ९८ हजार रुग्ण असून त्या खालोखाल स्पेन, ब्रिटनचा क्रमांक लागतो.