CoronaVirus News : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:22 IST2020-12-20T01:22:27+5:302020-12-20T01:22:45+5:30
CoronaVirus News : शनिवारी २५,१५३ नवे कोरोना रुग्ण सापडले असून २९,८८५ जण बरे झाले आहेत.

CoronaVirus News : देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांवर
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींपेक्षा अधिक झाली असून त्यातील ९५.५० लाख लोक बरे झाले आहेत. शनिवारी बरे झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही ४ लाखांपेक्षा कमी असून मृत्यूदराचे प्रमाण १.४५ टक्के आहे.
शनिवारी २५,१५३ नवे कोरोना रुग्ण सापडले असून २९,८८५ जण बरे झाले आहेत. एकूण संख्या १,००,०४,५९९ तर बरे झालेल्यांचा आकडा ९५,५०,७१२ झाला आहे. शनिवारी आणखी ३४७ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,४५,१३६ वर पोहोचली आहे. देशात ३,०८,७५१ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण ३.०८ टक्के आहे. जगभरात कोरोनाचे ७ कोटी ६० लाख रुग्ण असून त्यातील ५ कोटी ३३ लाख रुग्ण बरे झाले.