CoronaVirus News : चित्रीकरण बंद असल्याने ‘ड्रीम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली फळे विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:01 IST2020-05-20T00:42:55+5:302020-05-20T07:01:43+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात.

CoronaVirus News : चित्रीकरण बंद असल्याने ‘ड्रीम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली फळे विकण्याची वेळ
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रीकरणही बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘तितली’सारख्या हिंदी चित्रपटांत छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये चमकलेल्या दिवाकर सोळंकी या कलाकारावर लॉकडाऊनमुळे पोट भरण्यासाठी आता दिल्लीच्या रस्त्यावर फळे विकण्याची वेळ आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात. असेच स्वप्न उराशी बाळगून दिवाकर सोळंकीदेखील मुंबईला गेले होते. हिंदी चित्रपटांतून छोट्या-छोट्या भूमिका करत एक दिवस मोठी झेप घ्यायची असे त्यांनी मनाशी
ठरविले होते.
कोरोनाचे संकट भारतात आल्यानंतर, त्या साथीचा फार फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडले. ते लवकर सुरू होण्याचीही चिन्हे दिसेनात. हिंदी चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करून गुजराण करणाºया अनेक कलाकारांची त्यामुळे पंचाईत झाली. त्यातलेच एक कलाकार असलेल्या दिवाकर सोळंकी यांचे लग्न झालेले असून त्यांना पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
आपल्या कुटुंबांचे पोट भरण्यासाठी काही तरी करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दिवाकर सोळंकी लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत परतले व त्यांनी रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसाय
सुरू केला.
त्यांनी सांगितले की, कोणतेही काम कमी दजार्चे नसते. फळविक्रीच्या व्यवसायातून माज्या कुटुंबाची गुजराण होत आहे. सध्या होत असलेली कमाई आम्हाला पुरेशी आहे.
पुन्हा चित्रपटांत जाणार
- दिवाकर सोळंकी हे काही कायमचे दिल्लीत राहायला आलेले नाहीत. लॉकडाऊन मागे घेण्यात आल्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत होतील. चित्रपटांचे चित्रीकरणही पुन्हा सुरू होईल अशी त्यांना आशा आहे. तसे झाल्यास ते मुंबईला पुन्हा चित्रपटांच्या जगात परत जातील. लॉकडाऊन नसता तर काही चित्रपटांत आणखी छोट्या-मोठ्या भूमिका करताना मी तुम्हाला दिसलो असतो, असे सोळंकी आवर्जून सांगतात.