शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 17:10 IST

सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला आहे.

ठळक मुद्देहेटरो ग्रुप व्यतिरिक्त प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती.येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे.

 नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिव वाढत आहे. कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी आणखी एक औषध बाजारात येत आहे. हेटरो ग्रुप व्यतिरिक्त प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती. हेटरोने आपले औषध लाँच केले आहे. तसेच, आता येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे. रेमडेसिवीरच्या या जेनेरिक व्हर्जनचे नाव सिप्रेमी (Cipremi) आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंपनीने सांगितले की, औषधाची पहिली बॅचही तयार आहे.

कुठे तयार होईल, किती खर्च येईल?सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला आहे. त्या बदल्यात बीडीआर फार्माने तयार डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला. सिप्लाच्या सीएफओच्या मते, हे औषध एक किंवा दोन दिवसात सुरू होणार आहे. मात्र, सध्या किती डोस तयार आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. अहवालानुसार, सिप्ला Cipremi नावाने औषध सुमारे ४ हजार रुपये प्रति वॉयलच्या दराने विकले जाईल. म्हणजेच हेटरो ग्रुपपेक्षा ते १४०० रुपयांनी स्वस्त असेल.

आतापर्यंत फक्त एकच कंपनी हे औषध बनवित होतीड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर हेटरो ग्रुपने Covifor नावाने औषधांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. आतापर्यंत केवळ त्यांचीच औषधे पुरविली जात आहेत. कंपनीने एका वॉयलची किंमत ५४०० रुपये ठेवली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार वॉयलचा पुरवठा केला आहे. सिप्लाच्या या घोषणेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. हे औषध मध्यम ते अत्यवस्थ कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर केले गेले आहे.

उत्पादन वेगाने वाढवण्याची गरज कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता भारतामध्ये या औषधाचे उत्पादन वेगाने वाढवण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून ७१९६६५ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१६० आहे. सध्या कोरोनाचे २५९५५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशा स्थितीत औषधांचा काळेबाजार झाल्याचे वृत्त आहे. बर्‍याच ठिकाणी रेमडेसिवीरच्या एका वॉयलसाठी रूग्णांना 30 हजार ते 40 हजार रुपये मोजावे लागल्याचे दिसून आले.

औषधाचा पाच दिवसांचा डोस आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, रेमडेसिवीरचा डोस रूग्णांना सहा दिवसांऐवजी पाच दिवस दिला जाईल. 'क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल फॉर कोविड -१९' च्या नुसार पहिल्या दिवशी, कोरोना रूग्णाला इंजेक्शनच्या रूपात रेमडेसिवीरचे २०० एमजी डोस देणे आवश्यक असते. यानंतर, पुढील चार दिवस दररोज १००-१०० एमजी इंजेक्शन्स आवश्यक आहेत.

आणखी बातम्या...

हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं