शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 4:13 PM

CoronaVirus News: दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; आरोग्य मंत्रालयाच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळीच्या दिवसांत देशातल्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली होती. त्यावेळी आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांत देशातल्या काही राज्यांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर हरयाणा, मणिपूर, गुजरात आणि राजस्थानात केंद्रानं आरोग्य पथकं पाठवली आहेत. आता आणखी काही राज्यांमध्येही वैद्यकीय पथकं पाठवण्याचा विचार केंद्राकडून सुरू आहे.कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यानं चाचण्यांचं प्रमाण वाढवा, असा सल्ला याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिला आहे. कोरोनाचे रुग्ण जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याआधी आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यादृष्टीनं पावलं उचला. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी अभियानं राबवा, अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारनं दिल्या आहेत. कोरोना रुग्ण वेळेत आढळून येत नसल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं निरीक्षण मंत्रालयानं नोंदवलं....म्हणून मुंबईत कोरोना घटला आणि दिल्लीत वाढला, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारणकेंद्र सरकारची पथकं नेमकं काय करणार?केंद्र सरकारनं पाठवलेली पथकं कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांच्या दौरा करतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या आवश्यक योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या पथकांकडून केलं जाईल. राज्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत काम करून कोरोनाविरुद्धच्या लढाईचं व्यवस्थापन मजबूत करण्याची जबाबदारीदेखील या पथकांवर असेल. मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन), हरयाणा आणि राजस्थानातही दिसू लागला आहे. या भागांमधल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.महाराष्ट्र, दिल्लीनं चिंता वाढवलीमहाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती केंद्रासाठी चिंताजनक ठरत आहे. महाराष्ट्रात काल कोरोनाचे ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातल्या एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ६३ हजार ५५ वर पोहोचला. काल राज्यात १५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ४६ हजार ३५६ इतकी झाली. तर दिल्लीत काल कोरोनाचे ७ हजार ५४६ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांचा आकडा ५.१ लाखाच्या पुढे गेला. राजधानीत काल कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९८ इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस