CoronaVirus News : प्रवाशांसाठी एअर इंडिया विकत घेणार सहा लाख पीपीई किट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:29 IST2020-06-21T02:23:07+5:302020-06-21T06:29:33+5:30
विदेशात अडकलेल्या भारतीयांपैकी दररोज काही हजार जणांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे भारतात आणले जात आहे.

CoronaVirus News : प्रवाशांसाठी एअर इंडिया विकत घेणार सहा लाख पीपीई किट
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आपल्या प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ६ लाख पीपीई किट विकत घेणार आहे. त्यामध्ये फेस शिल्ड, मास्क, हँड सॅनिटायझरचाही समावेश असेल. विदेशात अडकलेल्या भारतीयांपैकी दररोज काही हजार जणांना एअर इंडियाच्या विमानांद्वारे भारतात आणले जात आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू झाली. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुरक्षेसाठी पीपीई किट देणे आवश्यक ठरले आहे. एअर इंडियाप्रमाणेच एमिरेट्स या विमान कंपनीदेखील प्रवाशांना सेफ्टी किट द्यायला सुरुवात केली आहे.
एअर इंडिया सहा लाख पीपीई किटसाठी निविदा मागविणार आहे. मात्र या किटची संख्या त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार कमी किंवा जास्तही होऊ शकते, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत भारतात आणले जाणाºया प्रवाशांसाठी तसेच विमानसेवेचा वापर करणाºया प्रवाशांसाठी हे किट एअर इंडिया प्राधान्याने वापरण्याची शक्यता आहे.