शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

CoronaVirus News: देशात चार दिवसांत नव्या १ लाख कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:59 PM

राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व बळी महाराष्ट्रामध्येच आहेत.

नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाचे ३४,८८४ नवे रुग्ण आढळून आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. एकूण रुग्णांची संख्या १०,३८,७१६ झाली असून आणखी ६७१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या आता २६,२७३ वर पोहोचली आहे. मागील अवघ्या चार दिवसांतच एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात ३,५८,६९२ रुग्णांवर उपचार सुरू असून ६,५३,७५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी कोरोना आजारातून बरे झालेल्यांचे प्रमाण ६२.९४ टक्के आहे. सलग तिसऱ्या दिवशी ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांत अमेरिका, ब्राझिलपाठोपाठ भारत तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व बळी महाराष्ट्रामध्येच आहेत. शनिवारी बळी गेलेल्या ६७१ जणांमध्ये महाराष्ट्रातील २५८, कर्नाटकमधील ११५, तमिळनाडूतील ७९, आंध्र प्रदेशमधील ४२, उत्तर प्रदेशमधील ३८, पश्चिम बंगाल, दिल्लीमधील प्रत्येकी २६, गुजरातमधील १७, जम्मू-काश्मीर व पंजाबमधील प्रत्येकी ९, मध्य प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी ८ जणांचा समावेश आहे. तसेच तेलंगणामध्ये ७, हरयाणात ५, झारखंड, बिहार, ओदिशामध्ये प्रत्येकी चार, आसाम, पुडुचेरीमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगढ, गोवामध्ये प्रत्येकी दोन, केरळ व उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे शनिवारी बळी गेला.

देशात सर्वाधिक बळी महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ११,४५२ आहे. बळींची एकूण संख्या दिल्लीत ३७५१, तमिळनाडूत २३१५, गुजरातमध्ये २१०६, कर्नाटकात ११४७, उत्तर प्रदेशामध्ये १०८४, प. बंगालमध्ये १०४९, मध्य प्रदेशमध्ये ६९७ व राजस्थानमध्ये ५४६ इतकी आहे. बळींपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना एकापेक्षा जास्त व्याधी होत्या. महाराष्ट्रामध्ये शनिवारी रुग्णसंख्या २,९२,५८९ झालीे. तमिळनाडूत १,६०,९०७, दिल्लीमध्ये १,२०,१०७, कर्नाटकमध्ये ५५,११५, गुजरातमध्ये ४६,४३० रुग्ण आहेत.

चाचण्या १ कोटी ३४ लाखांवर

इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे की, देशात शुक्रवारी कोरोना चाचण्यांची संख्या १,३४,३३,७४२ वर पोहोचली आहे. शुक्रवारी देशभरात कोरोनाच्या ३,६१,०२४ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत