Coronavirus : मुंबई-पुण्याच्या व-हाडींना गावाबाहेर रोखले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:00 AM2020-03-20T07:00:11+5:302020-03-20T07:00:28+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

Coronavirus: Mumbai-Pune and Varadhi are barred outside the village! | Coronavirus : मुंबई-पुण्याच्या व-हाडींना गावाबाहेर रोखले!

Coronavirus : मुंबई-पुण्याच्या व-हाडींना गावाबाहेर रोखले!

Next

अकोला : कामानिमित्त पुणे आणि मुंबईत वास्तव्यास असलेल्या येथील एका जोडप्याचा विवाह चांदूर येथे आयोजित केला होता. ग्रामस्थांना त्याची माहिती मिळताच वºहाडींना गावाबाहेर थांबवण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या मदतीने या व-हाडींना गावात प्रवेश नाकारण्यात आला. काही मोजक्या व-हाडींच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आले. वºहाडींची गावाबाहेरच्या शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन तथा ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली. वºहाडींना गावात प्रवेश देऊ नये अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे चांदुरात दाखल झालेल्या वºहाड्यांना पोलिसांनी गावाबाहेरच रोखले. तसेच त्यांना परत जाण्याचा आदेश दिला.
काही मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. वºहाडासाठी गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती; मात्र त्यातील अनेक वºहाडींनी आपआपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेणे पसंत केले.

Web Title: Coronavirus: Mumbai-Pune and Varadhi are barred outside the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.