CoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:03 AM2021-05-17T09:03:51+5:302021-05-17T09:05:09+5:30

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डाक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे.

CoronaVirus medicine 10,000 Packets Of DRDO's Anti-Covid Oral Drug To Be Distributed Today  | CoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार

CoronaVirus: आज वाटली जाणार DRDO च्या कोरोनावरील औषधाची 10 हजार पाकिटं, पाण्यात विरघळून घेता येणार

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीतील डीआरडीओ भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात संरक्षण मंत्री काही निवडक रुग्णालयांच्या डॉक्टरांना या औधाचे 10 हजार पाकिटे सोपवतील.ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हे औषध पावडर स्वरुपात असून ते सहजपणे पाण्यात विरघळून घेतले जाऊ शकते.

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांसाठी प्रभावी मानले जात असलेले औषध '2 डीजी' सोमवारी लाँच करण्यात येत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) हे औषध तयार केले आहे. दिल्लीतील डीआरडीओ भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात संरक्षण मंत्री काही निवडक रुग्णालयांच्या डॉक्टरांना या औधाचे 10 हजार पाकिटे सोपवतील. या ऑषधामुळे कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होते. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, हे औषध सर्वांसाठीच एक आशेचा किरण आहे. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डाक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे, डीआरडीओने जवळपास 110 रुग्णांवर या औघधाची ट्रायल केली आहे आणि सर्वांचेच निकाल चांगले आले आहेत.

पुरुषांनो सांभाळा ! महिलांपेक्षा पुरुषच अधिक कोरोना पाॅझिटिव्ह

हे औषध कोरोनाचा सामना करण्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावी असल्याचे ट्रायलमधून समोर आले आहे. याच्या वापराने रुग्ण फार लवकर बरा होतो. हे एक प्रकारचे सूडो ग्लूकोज आहे. यामुळे व्हायरसची शरीरात पसरण्याची क्षमता कमी होते. हे औषध पावडर स्वरुपात असून ते सहजपणे पाण्यात विरघळून घेतले जाऊ शकते. कोरोनाच्या थैमानात रुग्णांसाठी हे औषध रामबाण सिद्ध होऊ शकते.

2-डीजी हे जगातील काही अशा औषधांपैकी एक आहे, जे प्रामुख्याने कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप कुठलाही परफेक्ट इलाज नाही. कोरोनावरील उपचारासाठी डॉक्टर अनेक प्रायोगिक औषधांचा आणि पद्धतींचा वापर करत आहेत. यात, रेमडेसिव्हिर, इव्हरमेक्टिन, प्लाझ्मा थेरपी आणि काही स्टिरॉइड्सचा समावेश आहे.

Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात प्रचंड थैमान घातले आहे.  देशात गेल्या काही आठवड्यांपासून रोजच्या रोज 3 लाख वर नवे कोरोना बाधित समोर येत आहेत, तर हजारोंच्या संख्येने मृत्यूची नोंद होत आहे. यातच आता 'ब्लॅक फंगस' चे रुग्णही अनेक राज्यांत समोर आले आहेत.

यासंदर्भात बोलताना डीआरडीओच्या रिसर्च लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) चे वैज्ञानिक डॉ. भट्ट म्हणाले होते, ''ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) मान्यतेनंतर डॉ. रेड्डीच्या प्रयोगशाळेने त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. हे औषध विशेषत: अशा रुग्णांना फायदा करेल जे व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनसह आहेत. असे रुग्ण लवकरच बरे होऊ शकतात. या औषधाचे उत्पादन वेगानं सुरू असून जूनपासून या औषधाचे 50 हजार ते एक लाख डोस दररोज लोकांना उपलब्ध करून दिले जातील.''

CoronaVirus News : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा पर्याय ठरू शकते DRDO ची नवीन प्रणाली 

असे आहे नव्या औषधाचे स्वरूप -
डीआरडीओचे 2-डेओक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात विरघळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत हे ओळखून हे औषध त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते.
 

Web Title: CoronaVirus medicine 10,000 Packets Of DRDO's Anti-Covid Oral Drug To Be Distributed Today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.