शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 8:57 PM

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

ठळक मुद्दे महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे.पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात 31जुलैपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे.

कोलकाता : महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील. मात्र, लॉकडाउनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे. 

लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक -लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत नवे कोरोनाबाधीत आणि राज्याची स्थिती, यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगण्यात येते, की काही सूट आणि काही अटींच्या आधारे 31 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू राहील.

देशात पुन्हा लॉकडाउनची शक्यता -कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. चेन्नई, नंतर गुवाहाटी आणि आता पश्चिम बंगालने लॉकडाउन लागूदेखील केला आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना तामिळनाडू सरकारने चेन्नै आणि जवळपासच्या तीन जिल्ह्यांत 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने गुवाहाटीच्या 11 नगर पालिका भागांत मंगलवारपासून 14 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे.

बंगालमध्ये 580 जणांचा बळी -पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत एकूण 14,728 कोरोनाबाधित समोर आले आहेत. यापैकी, कोरोनाचे एकूण 9,218 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 580 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात एकूण 4,930 अॅक्टिव रुग्ण आहेत. याशिवाय 1,81,388 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीIndiaभारतChennaiचेन्नई