शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:31 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 41 लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 41 लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 4213 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 67152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2206 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 4213 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 67152 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2206 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 44029 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 20917 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट केली होती. यात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारची चिंता आता आणखीच वाढली आहे. कारण ग्रीन झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यान ते रेड झोन होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर ग्रीन झोन हे रेड झोन होऊ शकतात अशी शक्यता दिल्ली एम्सचे वरिष्ठ डॉक्टर आणि टास्क फोर्सच्या सदस्याने वर्तवली आहे. ग्रीन झोन असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये 9 दिवसांत संक्रमणाची 283 नवीन प्रकरणं दिसत आहेत. त्रिपुरातील ग्रीन झोन जिल्ह्यांमधून संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहे. त्यानंतर ओडिशातील कित्येक राज्यांमध्ये नवीन प्रकरणं मिळाली आहे. पंजाबमध्येही अशीच परिस्थिती असल्याची माहिती मिळत आहे.  ज्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित केले गेले तेथे एका आठवड्यात संक्रमणाची नवीन प्रकरणं पाहायला मिळाली आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू