शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "Covid रिपोर्टिंगमध्ये उत्तर प्रदेश, बिहारची कामगिरी सर्वात वाईट"; रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 11:47 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा 14 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या धक्कादायक आकडेवारीने चिंता वाढवली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांचा आकडा 14 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या धक्कादायक आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 14,35,453 वर गेली आहे तर आतापर्यंत देशभरात तब्बल 32,771 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,931 नवे रुग्ण आढळून आले असून 708 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संदर्भात विविध ठिकाणी संशोधन करण्यात येत आहे.

संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी देशातील कोरोना परिस्थितीचा अभ्यास केला आहे. यामध्ये कर्नाटक सरकारने सर्वात चांगलं काम केलं असल्याने त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. कोरोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. 

भारतामधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा अहवाल हा MedRxiv मध्ये देण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाचा डेटा कोणत्या राज्याने  संकलित केला त्याची माहिती दिली आहे. "आम्ही भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून नोंद करण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा तुलनात्मक सखोल अभ्यास केला असून त्याचा अहवाल सादर करत आहोत" असं अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटलं आहे.देशातील राज्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारीची गुणवत्ता तपासण्यासाठी एक सेमी क्वांटीटेटीव्ह पद्धतीचा वापर केला.

भारतामधील विविध राज्यांमधील कोरोनासंदर्भातील आकडेवारीचा चार प्रमुख मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आला. ज्यात उपलब्धता, माहिती लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रमाण, माहितीमधील सर्व तपशील आणि गोपनियता या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करुन अभ्यासकांनी ‘कोविड 19 डेटा रिपोर्टिंगमध्ये  स्कोअर (सीडीआरएस 0 ते 1 दरम्यानचे रेटींग )’ काढला. 19 मे ते 1 जूनमध्ये संशोधकांनी माहितीचा सखोल अभ्यास केला आहे. 

"आमच्या अभ्यासामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमधील गुवणत्तेमध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत आहेत. कर्नाटकचा सीडीआरएस हा 0.61 इतका आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहारचा सीडीआरएस शून्य आहे. तर संपूर्ण देशाचा सरासरी सीडीआरएस 0.26 इतका आहे. पंजाब आणि चंढीगडमधील अनेक वेबसाईट क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची माहिती सार्वजनिक करुन त्यांचा गोपनियतेच्या हक्काचा भंग करत असल्याचेही अहवालामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लय भारी! PPE किट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण; अनोख्या लग्नाचा Video तुफान व्हायरल

रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकAmericaअमेरिकाBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूIndiaभारत