शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 62,939 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 10:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाविरोधात देशवासीयांचा लढा सुरू असला तरी गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. लॉकडाउन, फिजिकल डिस्टन्सिंग, घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुण्याची सवय लोकांनी अंगीकारली असली तरी या काळात कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. तिसऱ्या लॉकडाउनचा शेवटचा आठवडा सुरू होताना देशातील रुग्णसंख्या 60 हजारांच्या वर पोहोचली. दररोज सरासरी तीन हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 62939 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2109 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (10 मे) आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3277 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 62 हजारांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2100 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 41472  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 19358 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 40 लाखांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने 2 लाख 78 हजार 800 जणांचा बळी घेतला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी 20 हजारांवर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना रुग्णांची ही संख्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 33% आहे. महाराष्ट्रात सतत वाढणाऱ्या या प्रकरणांमुळे केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशातील 15 जिल्ह्यांमध्ये 64% प्रकरणे आहेत. यातील दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील जिल्ह्यांमध्ये 50% कोरोना प्रकरणे आहेत. सध्या या 5 शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर महाराष्ट्रात 779 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1165 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार 228 इतका झाला आहे. दिवसभरात 330 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत तब्बल 3800 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

coronavirus: कोरोनाचा उद्रेक! जगभरात ४०.७२ लाख; देशात ६२ हजार, तर राज्यात २० हजार रुग्ण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई