CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:47 IST2020-05-11T16:42:31+5:302020-05-11T16:47:01+5:30
आज दिवसभरात १५५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे रिकव्हरी रेट ३१.१५ टक्क्यांवर गेला आहे.

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा कोरोनावर पत्रकार परिषद सुरु केली. डिस्चार्जच्या बदलेल्या नियमांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून याचबरोबर नव्या कोरोना बाधितांचा आकडाही कमालीचा वाढला आहे. आज देशभरात ४२१३ नवे रुग्ण सापडले असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
आज दिवसभरात १५५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे रिकव्हरी रेट ३१.१५ टक्क्यांवर गेला आहे. देशातील एकूण रुग्णांचा आकडा ६७१५२ वर गेला असल्याचे अगरवाल म्हणाले.
देशातील एकूण २०९१७ रुग्ण बरे झाले असून आता ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जगभरातील ७ देशांनी तेथील डिस्चार्ज पॉलिसी बदलली आहे. चाचणी ऐवजी आता लक्षणे आणि वेळ यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे भारतानेही यामध्ये बदल केले आहेत, असेही अगरवाल म्हणाले.
The total number of recoveries is 20917, 44029 people are under active medical supervision. In last 24 hours, there were 4213 new cases & 1559 recoveries. Recovery rate is now at 31.15%. Total number of cases is at 67,152: Lav Agarwal, Joint Secretary of Health Ministry #COVID19pic.twitter.com/cVWiV9fOvn
— ANI (@ANI) May 11, 2020
होम क्वारंटाईन संदर्भात सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. होम क्वारंटाईनसंबंधित आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर घरातच क्वारंटाईन ठेवण्यात आलेले लोक हे होम क्वारंटाईनमधून केव्हा बाहेर येऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार. ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत असे रुग्ण लक्षणे दिसल्यापासून 17 दिवसांनंतर होम क्वारंटाईन बाहेर येऊ शकतात अथवा ते संपवू शकतात. मात्र या 17 दिवसांच्या काळात सलग 10 दिवस अशा रुग्णाला ताप आलेला नसावा. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना 17 दिवसांनंतर कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू
अजब! चंद्राचा तुकडा विक्रीला; किंमत करोडोंच्या घरात