CoronaVirus Marathi News Prime minister Narendra modi video conference with cm of 10 states | कोरोनाचा सामना : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक, तयार केला 'मेगा प्लॅन'

कोरोनाचा सामना : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक, तयार केला 'मेगा प्लॅन'

ठळक मुद्देही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे.कोरोनाविरोधातील लढाई योग्य प्रकारे सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेला आहे.सक्रिय रुग्णांचा टक्का कमी झाला आहे. रिकव्हरी रेट वाढत आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरस महामारीसंदर्भात 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली. यानंतर, कोरोनावर राज्यांसोबत काम सुरू असून, ही लढाई योग्य प्रकारे चालली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेला आहे. या बैठकीत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी  झाले होते. 

ही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे ही बैठक महत्वाची आहे.

देशातील रिकव्हरी रेट वाढतोय -
सक्रिय रुग्णांचा टक्का कमी झाला आहे. रिकव्हरी रेट वाढत आहे. याचाच अर्थ आपले प्रयत्न यशस्वी सिद्ध होत आहेत. ज्या राज्यांत तपासणी दर कमी आहे आणि जेथे पॉझिटिव्ह रेट अधिक आहे. तेथे टेस्टिंग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. विशेषतः बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगाना या राज्यांत टेस्टिंग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच आज टेस्टिंग नेटवर्क शिवाय आरोग्य सेतू अ‍ॅपही आपल्याकडे आहे. या अ‍ॅपच्या माध्यमानेही आपण हे काम सहजपणे करता येऊ शकते. यासंदर्भात या समीक्षा बैठकीत चर्चा झाली. 

देश ही लढाई नक्कीच जिंकेल -
आज या प्रयत्नांचे परीणाम आपण पाहत आहोत. रुग्णालयांतील उत्तम व्यवस्थापन, तसेच आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्यासारख्या प्रयत्नांचीही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे. आपल्या राज्यांत प्रत्यक्ष स्थितीवर लक्षदिल्याने जे परिणाम समोर आले आहेत. त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत आहे. मला आशा आहे, की  आपल्या या अनुभवाच्या ताकदीने देश ही लढाई पूर्णपणे जिंकेल आणि एक नवी सुरुवात होईल, असे मोदी म्हणाले. 

देशात एका दिवसात समोर येणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येत घट - 
या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. कोरोनाने देशात डोके वर काढल्यापासून आजपर्यंत पंतप्रधान मोदींची राज्यांबरोबरची ही सातवी बैठक आहे. देशात एका दिवसात समोर येणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी हा आकडा 53,601 होता. देशात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने 60,000 हून अधिक रुग्ण समोर येत होते.

महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 9 हजार 181 रुग्ण -
महाराष्ट्रात सध्या 10 लाख 1 हजार 268 लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर 35,521 लोक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 9 हजार 181 रुग्ण आढळले, तर 293 जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 24 हजारच्या पुढे - 
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 24 हजार 513 झाली असून एकूण 18,050 जणांनी जीव गमावला. दिवसभरात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्ण कोविडमुक्त झाले.

मुंबईत आणखी 46 बळी -
मुंबईत दिवसभरात 925 बाधित तर 46 मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 1 लाख 24 हजार 307 असून बळींचा आकडा 6,845 आहे. आतापर्यंत 97,993 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 78 टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर गेला आहे. दरम्यान, मुंबईत सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News Prime minister Narendra modi video conference with cm of 10 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.