CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:06 PM2020-05-14T16:06:11+5:302020-05-14T16:19:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

CoronaVirus Marathi News people started fighting food packet katihar SSS | CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

Next

कटिहार - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे.  भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 78,000 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिस्किटांच्या पुड्यांसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या कटिहार स्टेशनवर ही घटना घडली आहे. 

कटिहार रेल्वे स्टेशनवर प्रवास करणाऱ्या मजुरांना खाण्यासाठी बिस्किटचे काही पुडे देण्यात आले. मात्र बिस्किटांसाठी मजुरांमध्ये झटापट झाली आणि एकच गोंधळ झाला. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कटिहार स्टेशनवर श्रमिकांची गाडी थांबली असताना त्यांना खाण्यासाठी बिस्किटांच्या पुड्यांचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र ते करण्याआधीच या पिशवीवर मजूर तुटून पडल्याचं दिसत आहे. तसेच एकमेकांच्या हातातील बिस्किटांचे पुडे खेचून घेण्यासाठी झटापट सुरू झाली. काही दिवसांपुर्वी श्रमिकांच्या एका ट्रेनमध्येही असाच प्रकार घडला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रेल्वेने 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. तिकीटं रद्द करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वेकडून तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत. मात्र मजुरांसाठी चालवण्यात येत असलेल्या विशेष गाड्या सुरूच राहतील. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी सध्या रेल्वेकडून विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. रेल्वे 22 मेपासून मेल, एक्स्प्रेस आणि शताब्दी गाड्या सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्यांसह राजधानी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यानुसार शताब्दी विशेष आणि इंटरसिटी विशेष गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल. या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लासची 20 तिकिटं वेटिंगवर असतील. तर एसी सेकंड क्लासमध्ये 50 आणि एसी थर्ड क्लासमध्ये 100 तिकिटं वेटिंगवर असतील. स्लीपर क्लासमध्ये 200 तिकिटं वेटिंगवर असतील.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

 

Web Title: CoronaVirus Marathi News people started fighting food packet katihar SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.