शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान!; मुलाचं लग्न बापाला भलतंच महागात पडलं; 6,26,600 रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 12:47 IST

कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही ठिकाणी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे.

भीलवाडा  - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही ठिकाणी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. मात्र कोरोनाच्या काळात लग्न करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल सहा लाखांचा फटका बसला आहे. 

राजस्थानमधील भिलवाडामध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी एका वडिलांना 6,26,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका घरात 13 जून रोजी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. लग्न समारंभासाठी काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र या लग्नात नियमांचं योग्य रित्या पालन करण्यात आले नाही. 

समारंभात 50 हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला यामुळेच लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला याबाबत तब्बल 6 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे.  रविवारी (28 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19,906 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच  लाख 28 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सोळा हजारांवर पोहोचला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : "देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासमोर पंतप्रधानांचे सरेंडर", राहुल गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात

Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण

Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानmarriageलग्नIndiaभारतDeathमृत्यू