शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

By सायली शिर्के | Published: September 26, 2020 9:43 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 59 लाखांचा टप्पा पार केला आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 59 लाखांचा टप्पा पार केला आहे. पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 85,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,089 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 59,03,933 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 93 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 

शनिवारी (26 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 85,362 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 59,03,933 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 93,379 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 9,60,969 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 48,49,585 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात एक छोटीशी चूक ठरू शकते 'जीवघेणी', तज्ज्ञांचा खुलासा

कोरोनाच्या संकटात काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. डॉक्टरचा सल्ला घेण्याऐवजी अनेक जण हे आजारी पडल्यास मेडिकलमधून औषध घेतात.  डॉक्टरांच्या सल्लाशिवाय इतर कोणतीही औषधं घेणं हे जीवावर बेतू शकतं. योग्य वेळी उपचार न झाल्यास ते महागात पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना रुग्ण हे उपचारासाठी उशीरा दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात घाबरू नका, वेळीच योग्य उपचार करा असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एम्सच्या मेडिसिन विभागाचे एसोसिएट प्रोफेसर डॉ. नीरज निश्चल यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क नक्की घाला. तसेच कोरोनाची लागण झाल्यास ते इतरांपासून लपवून न ठेवता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने आरोग्याची नीट काळजी घ्यावी. ताप आला अथवा श्वास घेण्यास त्रास झाला तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हा, ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजन तपासा असं देखील निश्चल यांनी म्हटलं आहे. लोकनायक रुग्णालयातील डॉ. सुरेश कुमार यांनी "कोरोनाच्या काही रुग्णांची अवस्था ही गंभीर आहे. त्यामुळे नियमांचं पालन करा. बेजबाबदारपणा योग्य नाही, सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून जाऊ नका. घाबरून आणखी त्रास होण्याची शक्यता आहे. लक्षणं नसल्यास घराच्या मंडळींपासून थोडं वेगळं राहा, स्वत:ला आयसोलेट करून घ्या. कोरोनाची लागण झाल्यास शुगर, ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रॉल, डी-डाइमर हे देखील तपासणं गरजेचं आहे. तसेच होम आयसोलेशनच्या काळात वैद्यकीय सल्ला घ्या" अशी माहिती सुरेश कुमार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

Bihar Election 2020 : एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

गलवानमध्ये 'इतके' सैनिक झाले ठार; चीनने पहिल्यांदाच दिली कबुली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू