शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 3:11 PM

'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असे हर्षवर्धन म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 38 हजार 845वर पोहोचला आहे. आता देशात एकूण 77 हजार 103 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.देशात आतापर्यंत एकूण 57 हजार 721 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

नवी दिल्ली : देशत कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 6977 नवे कोरोनाबाधित समोर आले. तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळच्या सुमारास जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 38 हजार 845वर पोहोचला आहे. यापैकी 4 हजार 21 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशभरात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 57 हजार 721 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आता देशात एकूण 77 हजार 103 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, भारत कोरोना संक्रमानाच्या बाबतीत इराणलाही (1,25,701) मागे टाकत टॉप 10 देशांच्या यादीत पोहोचला आहे. 

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

महाराष्ट्राचा विचार करता, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 50, 231 झाली आहे. तर 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 394 नवे रुग्ण आढळले असून येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संक्या आता 14,063 वर पोहोचली आहे. तर येथे आतापर्यंत 858 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 41.28 टक्के आहे. तपासणीतही वेग आला आहे. सध्या रोज जवळपास 1,50,000 टेस्ट होत आहेत. ते म्हणाले, 'कालच आम्ही 1,10,397 नमुने तपासले आहेत. कालपर्यंत आम्ही 29,44,874 नमुने तपासले आहेत. 

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

'आज तीन दिवसांच्या अवधीत हा दर 13, सात दिवसांच्या अवधीत 13.1 आणि 14 दिवसांच्या अवधित 12.7, असा आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2.9 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 41.2 टक्के झाले आहे. यातून स्पष्ट होते, की लॉकडाउनचा चांगला फायदा झाला आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातIranइराण