शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
8
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
9
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
10
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
12
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
13
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
14
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
15
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
16
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
17
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
18
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
19
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
20
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चिंताजनक! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांवर; 'या' 5 शहरांतील स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 09:20 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केल्यानंतरच्या कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी 40 हजार असलेली रुग्णांची संख्या त्यानंतर काही दिवसांतच 90 हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे.

स्थलांतरामुळे विशेषत: शहरातील कोरोना हा गाव-खेड्यांमध्ये पोहचल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती ही चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील स्थिती ही गंभीर आहे. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 46 हजार आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 2,800 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना  व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत.

अहमदाबादमध्ये आढळले 973 कोरोना रुग्ण

गुजरातमध्ये शनिवारी आढळलेल्या 1057 नव्या कोरोनाबाधितांमध्ये अहमदाबादमधील 973 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत 8,144 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 493 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी 14 जणांचा शनिवारी मृत्यू झाला. आतापर्यंत गुजरातमधील संक्रमितांचा आकडा 10,989वर पोहोचला आहे.

दिल्ली 10 हजारच्या जवळ, तामिळनाडू 10 हजारच्या पुढे 

राजधानी दिल्लीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9,333 वर गेला आहे. येथे शनिवारी 438 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर आतापर्यंत दिल्लीत 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण दिल्ली सध्या रोडझोनमध्ये आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये आज 477 नवे रुग्ण आढळून आले. याबरोबरच येथील कोरोना रुग्णांचा आकडा 10,585 वर पोहोचला आहे. 

महाराष्ट्राची स्थिती गंभीर 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. हा आकडा आता तब्बल 30 हजार 706 वर जाऊन पोहोचला आहे. दिवसभरात राज्यात एकूण 1606 नव्या रुग्णांचे निदान झाले. तर 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. तर 22 हजार 479 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

फक्त एक कप चहाने अनेकांचं आयुष्य वाचवलं; जाणून घ्या 'त्या' दिवशी नेमकं काय झालं?

चीनच्या कंपन्यांना खेचण्यासाठी भारताचा 'डाव'; 'या' 9 राज्यांत देणार वाव

पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी

धक्कादायक! IASच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट; उडाली खळबळ

पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईPuneपुणेdelhiदिल्लीahmedabadअहमदाबादChennaiचेन्नईDeathमृत्यू