शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोना बाधितांचा आकडा 34 लाखांवर, 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 11:53 IST

केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.

ठळक मुद्देदेशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,63,973 वर पोहोचली आहे.कोरोनामुळे देशात आतापर्यंत 62,550 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तब्बल 26,48,999 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत. 

नवी दिल्ली -भारतात कोरोना संक्रमितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत 62,550 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादाक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 26,48,999 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत. 

केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.

आरोग्यमंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेली आकडेवारी -

  • देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 34,63,973
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या - 62,550 
  • देशात आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या - 26,48,999
  • गेल्या 24 तासांतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या - 76,472
  • गेल्या 24 तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या - 1,021
  • देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या - 7,52,424

 

महाराष्ट्र वाढवतोय चिंता - संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज जवळपास 14 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी तब्बल 14,361 नवे कोरोनाधित समोर आले आहेत. याच बरोबर महाराष्ट्रातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या आता 7,47,995 वर पोहोचली आहे. तर कोरनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 23,775 वर पोहोचला आहे.

दिल्लीत रोज आढळतायत 1800 पेक्षा अधिक रुग्ण - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून रोज कोरोनाचे 1800 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. दिल्लीत शुक्रवारी 1,808 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा  1,69,412 वर पोहोचला आहे. येथे शुक्रवारी एका दिवसात 1800 हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले होते. तर गुरुवारीही 1,840 रुग्ण आढळून आले होते. दिल्ली आरोग्य विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 4,389 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील महाराष्ट्र आणि दिल्ली बरोबरच, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि हरियाणा येथेही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

अंधारी रात्र, जबरदस्त पाऊस अन् गोळ्यांचा वर्षाव; आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलdelhiदिल्ली