शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

नवी दिल्ली - देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने नऊ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,498 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 553 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.02% झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये पान मसाल्याची तलफ आल्याने एका कोरोना रुग्णाने थेट रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील कंट्रोल रूमच्या कॅमऱ्यांना चकमा देत कोरोनाग्रस्त आयसोलेशन वॉर्डमधून पसार झाला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णाचा वेगाने शोध घेण्यात आला. रुग्णालय प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर कोरोनाग्रस्ताचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाग्रस्ताला पान मसाला खाण्याची तलफ आली. म्हणून त्याने रुग्णालयातून पळ काढला. रुग्णालयाजवळ पानाची टपरी दिसली नाही यामुळे त्याने टपरी शोधण्यासाठी थोडा प्रवास केला. यानंतर एका टपरीवरून त्याने पान मसाला विकत घेतला आणि आपली तलफ भागवली. तसेच तो एका मित्राच्या घरी देखील पोहचला. त्या कुटुंबाला याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी रुग्णाला घरात घेतले.

कोरोनाग्रस्ताने मित्राच्या कुटुंबियांना आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा अशी विनंतीही केली. मात्र याच दरम्यान रुग्णाचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आलं. पान मसाला खाण्यासाठी रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि अनेकांच्या जीव धोक्यात आला आहे. तसेच मित्राच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी या रुग्णाला सध्या विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

CBSE Results 2020 : मोठी बातमी! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर 

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

बंगल्यात आणखी काही दिवस राहू द्या, प्रियंका गांधींनी केली मोदींना विनंती?, जाणून घ्या सत्य

CoronaVirus News : सलाम! ...अन् डॉक्टरने स्वत: ट्रॅक्टर चालवून अंत्यसंस्कारासाठी नेला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलIndiaभारतPoliceपोलिस