शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 10:13 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे  64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 27 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 52,889 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे  64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील रुग्णांचा आकडा  27,67,274 वर पोहोचला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कोविड-19 क्लिनिक सुरू होत आहे. यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणं आढळल्यास त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. देशात सध्या कोरोनाचा कहर आहे. 

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ अनेकांना पुन्हा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनातून लोक बरे होत आहेत. मात्र त्यानंतर देखील आता रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. आम्हाला यासंदर्भात रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. म्हणूनच पोस्ट कोविड-19 क्लिनिक सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 

डॉ. बी. एल. शेरवाल यांनी 'आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाला श्वासोच्छवासाची समस्या असते. दुसर्‍या रुग्णाला खोकल्याचा त्रास होतो. त्याच वेळी, काही रुग्ण फुफ्फुसाचा आजार झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत' असं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! खेड्यापाड्यात पायी प्रवास करून 'हे' डॉक्टर्स करताहेत रुग्णांवर उपचार 

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...

धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी

CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूdoctorडॉक्टरIndiaभारत