शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 10:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सरकारने बंदी केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या बंद होत्या. गेले अडीच महिने बंद असलेली देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सरकारने बंदी केली आहे. सोमवारपासून (8 जून) मंदिरे, प्रार्थनास्थळे, उपाहारगृहे, हॉटेल्स व मॉल पुन्हा सुरू करताना कोणत्या गोष्टींना प्रतिबंध असेल व इतर गोष्टी करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्या आहेत. 

सर्व ठिकाणी प्रवेशद्वारापाशी 'हँड सॅनिटायझर' ठेवणे, योग्य अंतर ठेवून लोकांनी रांग कुठे लावावी याच्या खुणा आखणे व ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा व्यक्तींनाच प्रवेश देणे ही बंधने पाळावी लागतील. कोरोनाच्या संकटात व्हायरसचा धोका टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर केला जातो. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र काही मंदिरातल्या पुजाऱ्यांनी चक्क सॅनिटायझरचा वापर करायला विरोध केला आहे. 

सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्यामुळे मंदिरात त्याचा वापर केला जाऊ नये अजब दावा काही लोकांनी केला आहे. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. 'मार्गदर्शक सूचना जारी करणं हे शासनाचं काम आहे. मंदिरात सॅनिटायझर मशीन लावण्यास आमचा विरोध आहे कारण त्यामध्ये अल्कोहल असतं' असं भोपाळमधील एका मंदिराच्या पुजाऱ्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

उद्यापासून देशभरातील मंदिरांचेही प्रवेशद्वार उघडणार

- पादत्राणे वाहनातच काढून ठेवावी.

- आत येण्यापूर्वी प्रत्येकाने हात-पाय धुणे बंधनकारक.

- देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई.

- तीर्थ-प्रसाद वाटण्यास व पवित्र जल शिंपडण्यास मनाई.

- प्रत्येकाने बसण्यासाठी आपापली सतरंजी अथवा आसन आणावे.

- अनेकांनी एकत्र जमून भजने, आरत्या म्हणण्यास मनाई. त्याऐवजी भक्तिगीतांच्या रेकॉर्ड लावाव्या.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एका वादळाचा धोका; हवामान खात्याचा इशारा

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स

धक्कादायक! ...अन् तब्बल 22 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं; 'त्या' हत्येचं गूढ उकललं

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

बापरे! देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, 'या' राज्यांना केलं अलर्ट

CoronaVirus News : कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिरIndiaभारत