शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

coronavirus: कोरोना रोखण्यात महाराष्ट्र सर्वात मागे, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारची कामगिरी सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 6:19 AM

coronavirus Update : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले.

- विकास झाडेनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले. महाराष्ट्रात मात्र कोरोना प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वात निकृष्ट कामगिरी झाली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील हा निष्कर्ष महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवणारा ठरला आहे.महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ४८,५०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील एकूण १८ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोविड-१९ ची बाधा झाली. अर्थसंकल्पाच्या पूर्वी देशाची आर्थिक परिस्थिती दर्शविणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारने जाहीर केलाआहे.या अहवालात कोरोना महामारीला अर्थव्यवस्थेच्या नुकसानीसाठी जबाबदार धरले आहे. यामध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याच्या विविध राज्यांच्या प्रयत्नांचीही नोंद घेतली आहे. कोरोना रोखणे आणि मृत्यूची संख्या थांबविण्यात महाराष्ट्र सर्वात खालच्या स्थानावर असल्याचे नोंदविण्यात आले. लसीकरण सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोरोना कालावधीत तेलाचे उत्पादन ६ टक्के आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ५ टक्के घट झाली असल्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये तेलाचे उत्पादन ३४.२० दशलक्ष मेट्रिक टन होते. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते १२.१७ दशलक्ष मेट्रिक टन इतके मर्यादित झाले. त्याचप्रमाणे सन २०१९ मध्ये नैसर्गिक वायू उत्पादन ३२.८७ अब्ज घनमीटर होते. आर्थिक वर्ष २०२० मध्ये ते ३१.१८ अब्ज घनमीटर इतकेच होते.  

देशात कोरोना बळींची संख्याही घटू लागली नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी घटली असून, हे प्रमाण अवघे १.४० टक्के झाले आहे. या संसर्गातून १ कोटी ४ लाख ९६ हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो १.४३ टक्के झाला.देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,०२,५९१ असून त्यापैकी १,०४,९६,३०८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे १२,४०८ नवे रुग्ण आढळले व १५,८५३ जण बरे झाले. शुक्रवारी आणखी १२० जण मरण पावले असून, बळींची संख्या १,५४,८२३ झाली आहे. देशात ४९,५९,४४५ जणांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १,५१,४६० आहे. नव्या विषाणूचा स्पेनमध्ये द. आफ्रिकेतून शिरकावदक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे स्पेनमध्ये आतापर्यंत दोन जण बाधित झाले आहेत. या देशाने ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती प्रवेशबंदी घातली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारGujaratगुजरात