नवी दिल्लीः प्रवासी कामगारांसाठी चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनीही आता महाराष्ट्र सरकारवर पलटवार केला आहे. ठाकरे सरकारनं 80 गाड्या मागितल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातून 65 गाड्या रिकामी परत आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी 145 गाड्यांची व्यवस्था केली आहे आणि स्थानकांची माहितीही त्यांना देण्यात आली होती, परंतु मोठ्या खेदानं सांगावे लागेल की, आज दुपारी 12.30वाजेपर्यंत कामगारांविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज पाच वाजेपर्यंत 74 गाड्या महाराष्ट्रातून सुटतील, पण राज्य सरकारने 24 गाड्यांसाठीच मजुरांची व्यवस्था केली. रेल्वेमंत्री म्हणाले की, राज्यात सुमारे 50 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परप्रांतीय मजूर तिथे अडकून पडले आहेत.
हेही वाचा
CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला विमानात बसलेल्या प्रवाशांचा फोटो; म्हणाले...
बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले
CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले
"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"
CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'
ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?