coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 10:26 AM2021-04-14T10:26:02+5:302021-04-14T10:28:59+5:30

coronavirus, Lockdown in India: देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

coronavirus: Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman | coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

googlenewsNext
ठळक मुद्देआम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) कोरोनामुळे महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा झाली आहे. तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत. (Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman)

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही. 

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पाच सुत्री रणनीती तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली होती. 
 
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे १ लाख १४ हजार रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्याही एक हजाराच्या वर गेली आहे.  

दरम्यान, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत सीतारामन यांनी भारताला विकासासाठी अधिक कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्यासाठी जागतिक बँकेने घेतलेल्या निर्णयाबाबत सीतारामन यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Read in English

Web Title: coronavirus: Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.