शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 2:04 PM

मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले. 

नवी दिल्ली : काँग्रेसने देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. हातात पैसे नसताना गरीब लोक जेवण आणि औषधे कशी खरेदी करु शकतात?, लॉकडाऊनच्या काळात ते जीवन कसे जगतील? असे सवाल करत यांचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच, मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असेही पी. चिदंबरम म्हणाले. 

मोदी सरकारवर निशाणा साधत पी. चिदंबरम म्हणाले, "केंद्र सरकारने आवश्यक सुविधांसाठी राज्यांना निधी दिला नाही. तसेच, केंद्र सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबीयाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले नाहीत. याबद्दल आम्ही कडक शब्दांत निषेध करतो." याचबरोबर, पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला एक सल्लाही दिला आहे. केंद्र सरकार आपल्या २०२०-२१ च्या ३० लाख कोटीहून अधिक खर्च बजेटमधून ६५,००० कोटी रुपयांपर्यंत सहज काढू शकते. अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जास्तकरून उधार घेतले पाहिजे. हा सुद्धा अर्थतज्ज्ञांचा सल्ला चांगला आहे, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या ७ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ३०८ जणांचा मृत्यू झाला असून ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूर याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु केले आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब या राज्यांसह काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरम